बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांतच चिमुकलीला कोरोनानं गाठलं अन्…

अकोला | अकोल्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही चिमुकली त्या कुटुंबात 10 वर्षांनी झालेलं पहिलं मूल होतं.

अकोल्यातील खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 10 वर्षांनी या कुटुंबातील पाळणा हलला. मात्र जन्मानंतर 6 महिन्यांत या चिमुकलीला कोरोनाने गाठलं.

चिमुकली दोन दिवसांपूर्वी तापानं फणफणली होती. यानंतर चिमुकलीला अकोल्यातील मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं. तिथं तिची अँटिजेन टेस्ट करण्यात आली जी कोरोना पॉझिटिव्ह आली. चिमुकलीला कोरोना झाल्याचं निदान झालं.पण तिची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी चिमुकलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, 27 मे रोजी या मुलीला खूप ताप आल्याने रुग्णालया दाखल करण्यात आलं होतं. तिची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. सोबतच तिला जन्मजात हृदयाचा आजारही होती. मुलगी खूपच कमजोर होती. त्यामुळे उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला, असं जीएनसीमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वरठे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More