बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपालांनी सरकारला त्यांची चुक दाखवून दिली, नाहीतर…”

मुंबई | ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुरुवारी स्वाक्षरी केली आहे. यानंतर अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले होते.

राज्य सरकारकडून सुरुवातीला आलेल्या अध्यादेशात काही त्रुटी होत्या. तो अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केला असता, तरी न्यायालयाकडून त्यावर स्थगिती आली असती. ही चूक राज्यपालांनी सरकारच्या लक्षात आणून दिली असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे .

सर्वोच्च न्यायालयात केंद्राने वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनेच वेळ वाढवून घेतली असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ओबीसी आरक्षण अध्यादेश ठाकरे सरकारने राज्यपालांकडे सहीसाठी पाठवला होता.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता निकाली लागण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला…”; अतुल भातखळकरांची बोचरी टीका

पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! मोदींच्या भेटीनंतर कमला हॅरिस यांनी दिला पाकिस्तानला इशारा

‘या’ लोकांना कोरोना लस घरीच मिळणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

‘तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण…’; सुधीर मुनगंटीवार ठाकरे सरकारवर बरसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More