बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परिक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की, वाचून शिक्षक गेले कोमात

नवी दिल्ली | अनेक वेळा परिक्षेत उत्त लिहण्याऐवजी विद्यार्थी काही असं लिहितात जे तुफान चर्चेत येतं. अशीच एक उत्तर पत्रिका सध्या तुफान व्हायरल होत आहे. कारण ही उत्तर पत्रिका वाचून शिक्षक थेट कोमामध्ये गेले.

विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेत अशा काही गोष्टी लिहिल्या, ज्या सामान्यपणे आपण विचार देखील करू शकत नाही. ही उत्तरपत्रिका इंस्टाग्रामवरील ‘फनकी लाइफ’ या अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. यावर लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या असून उत्तरपत्रिका वाचणारे शिक्षक थेट कोमामध्ये गेले आहेत. उत्तर पत्रिका तपासल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्याला दहा पैकी शून्य मार्क दिले आहेत आणि खाली ‘टीचर कोमामे है’, असे लिहिले आहे.

या उत्तरपत्रिकेच्या फोटोला 19 हजारपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तसेच यामध्ये इतिहास, भूगोल, कला, साहित्य या सर्वांचा ताळमेळ लावून उत्तर लिहिण्यात आलं आहे. उत्तरावरुन प्रश्न भाक्रा धरणाबाबत विचारला असल्याची शक्यता आहे. प्रश्नाचं उत्तर लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर हे धरण सतलज नदीवर बांधण्यात आलं आहे. तसेच यात सरदार पटेल, टाटा, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, साखर, लंडन, जर्मनी आणि विश्व युद्धापर्यंत विद्यार्थ्याने लिहिलं आहे. विशेष म्हणजे इतकं सगळं सांगितल्यानंतर पुन्हा विद्यार्थी पंजाब आणि सतलज नदीवरुन धरणापर्यंत पोहोचतो.

दरम्यान, भलं मोठं उत्तर लिहिणारा हा विद्यार्थी नक्की कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याची उत्तर पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. काहींनी या विद्यार्थ्याचे पाय पकडण्याची मागणी केली आहे. तर काहींनी या विद्यार्थ्याला 21 तोफांची सलामी दिली आहे.

पाहा पोस्टः

 

View this post on Instagram

 

A post shared by fun_ki_life (@fun_ki_life)

थोडक्यात बातम्या-

T-20 World Cup: भारताच्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पाहा गेल्या 24 तासातील दिलासादायक आकडेवारी

“ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर…”

तुम्ही पिताय तो चहा भेसळयुक्त चहा पावडरपासुन तर बनवलेला नाही ना?, असं ओळखा

T-20 World cup: पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला कोहली, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More