बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सारं घर कोरोनामुळे रुग्णालयात, वृद्ध आजी 2 दिवस अन्नपाण्याविना गोठ्यात, शेवटी…

बीड | देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतानाच अचानक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अशातच जर कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर संपुर्ण परिवाराला क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशाप्रकारेच एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना बीडमधून समोर आली आहे.

संबंधित घटना ही बीड जिल्ह्यातील नाळवंडी याठिकाणी घडली आहे. घरातील सर्वजण कोरोनाबाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. यादरम्यान, पाठीमागे घरात राहणाऱ्या वृद्ध आजीचे अत्यंत वाईट हाल झाले आहेत. संबंधित आजी घरात एकट्याचं असल्यानं त्यांना स्वतःसाठी जेवणही बनवता आलं नाही. त्यामुळे त्यांना तब्बल दोन दिवस अन्नपाण्याविना जगावं लागलं आहे.

कोरोनाच्या भितीने आजीच्या घराशेजारील लोक देखील त्यांच्या मदतीला आले नाही. या घटनेची माहिती गावातील रहिवासी विजयसिंह बांगर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आजींना रुग्णालयात देखील दाखल केलं आहे. यानंतर आजीची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्यांना खाऊ पिऊ घातलं असून त्यांची प्रकृती बरी झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात आपली नाती तुटत असताना या तरुणांनी माणुसकीचा धर्म निभावत या वयोवृद्ध आजीला मायेचा आधार दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या-

अदर यांच्यानंतर आता वडील सायरस पुनावालाही लंडनला रवाना, नव्या चर्चांना उधाण

नियम न पाळणाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई, ॲम्बुलन्समध्ये बसवून कोरोना…पाहा व्हिडीओ

पुण्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा थरार, 10 जणांच्या टोळक्याकडून सपासप वार!

कोरोनामुळे ‘या’ तालुक्यातील दोन कुटुंबे उद्ध्वस्त, आठ दिवसांत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू

तौक्ते चक्रीवादळाचा यंदाच्या मान्सूनला होणार फायदा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More