मुंबई | सध्या कोरोनारूपी भयान संकट देशावर आलेलं आहे. त्यामुळे कोरोनाचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसला आहे. कलाक्षेत्रालाही कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. सगळ्या मालिकांचे आणि चित्रपटांचे शूटिंग्स बंद आहेत. त्यामुळे गाजलेल्या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’नंतर आता झी मराठी वाहिनीवर ‘तुला पाहते रे’ व ‘जय मल्हार’ या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या ६ एप्रिलपासून या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणार आहेत.
सोमवारपासून दुपारी 12 वाजता ‘तुला पाहते रे’ आणि संध्याकाळी 6 वाजता ‘जय मल्हार’ पाहायला मिळणार आहे. तुला पाहते रे मधून सुबोध भावे आणि गायत्री दातारची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. तर देवदत्त नागेची जय मल्हार मालिका घराघरात जाऊन पोहचली होती.
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. लॉकडाउनच्या काळात घरबसल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जात आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”
अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर
महत्वाच्या बातम्या-
तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी- हुसेन दलवाई
युवी अन् भज्जीने मदतीचं आवाहन केलं पण पाकच्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनसाठी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
अझीम प्रेमजींचं दर्यादिल… पाहा त्यांनी खरंच किती रक्कम मदत दिलीये
Comments are closed.