बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते”

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार फेल ठरलं आहे. तसेच मी शिवसेनेत असल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं, या मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच नव्हते, अशी टीका भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीये.

ठाण्यात भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी विरोधक आणि मराठा समाजाची पुढची भूमिका सांगितली. यावेळी भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव ऍड. संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेलं. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने काही सवलती दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावं, अशी मागणी देखील नारायण राणे यांनी केली.

राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून कोरोनामुळे अनकेच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी उठतात आणि फक्त हात धुवा, अंतर ठेवा, माझी जबाबदारी आणि लॉकडाऊन यासंदर्भातच बोलतात. आणि नंतर पुन्हा पिंजऱ्यात जातात, अशी टीका नारायण राणेंनी केली.

थोडक्यात बातम्या- 

सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

“ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रु”

सावधान! ओल्या आणि दमट मास्कमुळे वाढतोय काळ्या बुरशीचा धोका

‘डान्स’मुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महेश लांडगेंनी आळंदीत लावलं लेकीचं लग्न!

संभाजीराजेंंनी केलेल्या हेरगिरीच्या आरोपावर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More