शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई | शिवसेनेसोबत युती करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत फोनवरुन चर्चा केली.

या चर्चेत शिवसेनेनं ‘मोठा भाऊ’ होण्याचा आग्रह कायम ठेवला असून 1995 च्या जागावाटपाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची माहिती मिळत आहे.

1995 मध्ये शिवसेनेनं 169 तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. यावेळी युतीने 138 जागा जिंकत राज्यात सरकार स्थापन केलं होतं.

दरम्यान, या सुत्राचा स्वीकार झाला आणि राज्यात युतीचे सरकार आले तर शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘भारतरत्न’ स्वीकारण्यास भूपेन हजारिका कुटुंबीयांचा नकार

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

-“मुख्यंमत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

Google+ Linkedin