बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

नवी दिल्ली |  धूळ आणि प्रदुषणामुळे सध्या महिलांच्या केस गळण्यावर जास्त परिणाम होताना दिसतो. सततच्या केस गळण्याने सर्वच महिला, मुली वैतागल्या आहेत. मात्र यावर एक परिणाकारक उपाय देखील आहे. ज्याने तुमचे केस गळणे थांबेल. यासाठी तुम्हाला फक्त अंड्याची गरज आहे.

केस गळण्यासाठी तुम्ही अंडी वेगवेगळ्या प्रकारे वापरु शकता. यावेळी तुम्ही अंड्याचे हेअर मास्क वापरु शकता. अंडी आणि ऑलिव्ह ऑईलचं मिश्रण करुन केसांना लावावं. यासाठी एक अंडी फोडा आणि अंड्यातील पिवळ बलक वेगळा करा. एका भांड्यात फेटा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. हे दोन्ही मिक्स करून हेअर मास्क तयार करा. हे सर्व केसांवर आणि टाळूवर लावा. शॉवर कॅप घाला आणि 30-40 मिनिटे मास्क ठेवा. सौम्य शैम्पू आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केस गळतीवर उपचार करण्यासाठी हा मास्क परत केसांना लावा.

केसांसाठी आपण फक्त अंडी देखील वापरु शकतो. यासाठी दोन अंडी फोडून फेस येईपर्यंत त्याला फेटाळा. त्यानंतर ते मिश्रण केसांना आणि टाळूला लावा. यानंतर केस थंड पाण्याने आणि सौम्य शाम्पूने धुवा. ज्या प्रकारे ऑलिव्ह ऑईल वापरुन केसांसाठी हेअर मास्क तयार करतो त्याच पद्धतीने आणखी मास्क देखील तयार करता येतात.

दरम्यान, ऑलिव्ह ऑईल आणि अंडीच्या मास्क प्रमाणे नारळ तेल आणि अंडी एकत्र करावं. तसेच त्यामध्ये दूध देखील एकत्र करावे. त्याचप्रमाणे एक चमच मध आणि अंडी एकजिव करुन तासभर केसांना तसेच टाळूवर लावावं. नंतर थंड पाण्याने डोकं धुवावे.

थोडक्यात बातम्या-

फेसबुकने नाव बदललं अन् ट्विटरने उडवली खिल्ली, म्हणाले…

समीर वानखेडेंच्या ‘त्या’ दाढीवाल्या मित्राचा नवाब मलिकांनी केला खुलासा

‘5 किलो लाडूची सोय करा’ म्हणत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा भांडाफोड

समीर वानखेडेंना दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम

आता कोरोनावर मात करण्यासाठी ‘या’ कॅप्सुलनं होणार उपचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More