मुंबई | आरबीआयने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध घातले आहेत. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लादण्याआधी गुजरातच्या वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं तब्बल 265 कोटींची रक्कम काढून घेतल्याची बाब समोर आली आहे. या कंपनीने आपली सर्व रक्कम दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून हे निर्बंध लावल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून मिळालेली रक्कम येस बँकेत जमा करण्यात आली होती. मात्र आरबीआयने निर्बंध लावण्याआधीच या बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत वळवण्यात आले आहेत.
दरम्यान, सरकारी योजनेतून येणारा पैसा आणि बँकेतील ठेवी ग्राहकांना कसे देणार हा प्रश्न बँकेसमोर असल्यानं बँक अडचणीत सापडली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला- निलेश राणे
“आमच्या आंदोलनामुळेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी”
महत्वाच्या बातम्या-
सध्या देशात सुरु असलेला हिंसाचार पाहून दु:ख वाटतं- गुलजार
भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका- अयातुल्ला खामेनी
आमचं रक्त खवळलं म्हणून बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली- संजय राऊत
Comments are closed.