बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही”

पुणे | मराठा आरक्षण प्रश्नावरुन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याबाबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. तसेच मेटेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. राज्य सरकारने अशाप्रकारची याचिका दाखल करण्याची आवश्यकता होती. पण यांनी फक्त टीका करण्यात समाधान मानलं, असं विनायक मेटे म्हणाले.

आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचं सोडून हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसलंय. आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, असा गंभीर आरोपही विनायक मेटे यांनी केलाय. तसेच पुढच्या 5 तारखेनंतर बीडवरुन मोर्चा निघणार. लॉकडाऊन असला तरीही मोर्चा काढू. त्याचबरोबर मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आवाहनही करु, असा इशारा मेटे यांनी राज्य सरकारला दिलाय.

सगळंच जर केंद्र सरकारने करायचं तर तुम्ही काय करणार आहात?, असा सवाल मेटे यांनी राज्य सरकारला विचारलाय. पत्र लिहून किंवा हाता पाया पडून आरक्षण मिळत नाही, असा टोलाही मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, आपण लवकरच राज्यपालांना भेटून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला जाब विचारावा आणि त्यांना समज द्यावी, असं निवेदन देणार असल्याचं मेटेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?- देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला चंद्रकांत पाटलांनी भरला दम; म्हणाले, औकातीत रहावं…

‘कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार’; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

“भारत हिंमत हरलेला नाही, तुम्ही ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहात त्याची जाणीव आहे”

‘या’ खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; भारतीय संघांच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More