खेळ

विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

लंडन | विश्वचषक स्पर्धेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना एक संदेश दिला होता. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने मोदींच्या याच आवाहनाला प्रतिसाद दिल्याचं काल पहायला मिळालं.

रविवारी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथविरोधात घोषणबाजी सुरू केली. त्यानंतर विराटने प्रेक्षकांना थांबवून स्टीव्ह स्मिथच्या चांगल्या खेळाला टाळ्या वाजवून दाद द्या, अशी विनंती केली. आणि भारतीय प्रेक्षकांनी देखील त्याचं ऐकलं.

 

विश्वचषक स्पर्धेत सामने जिंका आणि सर्वांची मनेही जिंका, असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांच्या याच आवाहनाला विराटने प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत केले. त्यानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषदेत प्रेक्षकांच्या वतीने ऑस्ट्रेलियाची माफी मागितली.

महत्वाच्या बातम्या

-या कामगिरीमुळे युवराज सिंगला कुणीही विसरू शकणार नाही…!

-‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

-यंदाच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादीने दिला ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ संदेश

-“पराभवाची चर्चा बस्स करा; आता विधानसभेच्या तयारीला लागा”

“महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची वाताहत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या