बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जाणीवपूर्वक लसीकरण बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय?”

मुंबई | महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यामध्ये 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच कोरोना लसींचा साठा शिल्लक राहिला असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत महाराष्ट्र सरकारचा दावा खोटा असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून “केवळ तीन राज्यांना 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणतील कामगिरीच्या आधारावर” असं म्हणत महाराष्ट्राला 1.6 कोटी लस प्राप्त झाल्या तसं अधिकृत ट्विट डीजीआयपीरने 6 एप्रिलला केलं होतं. त्यापैकी 91 लाख लसी महाराष्ट्रात वापरल्या, म्हणजे आता 15 लाख लसी शिल्लक आहेत, मग जाणीवपूर्वक लसीकरण महाराष्ट्रात बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी शरद पवार यांचं बोलणं झाल्यानंतर आणि त्यांनी महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आरोग्यमंत्र्यांना अवगत केल्यानंतर मी स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याशी बोललो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राशी कोणताही भेदभाव होणार नाही आणि कामगिरीच्या आधारावर पूर्णपणे पुरवठा होईल असं सांगितलं असल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.

सध्या राज्यात कोरोनाचं संकट झपाट्याने वाढत आहे त्यातच राजकीय घडामोडींनाही चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सलग 8 ट्विट करून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. तसेच विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करत फडणवीसांनी त्यांना  चिमटे काढले आहेत.

थोडक्यात बातम्या

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; नाना पटोले आक्रमक

प्रकाश जावडेकरांचा पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

मोठी बातमी! मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार

‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More