नवी दिल्ली | बऱ्याच दिवसांपासून टिकटॉक या सोशल मीडिया अॅपच्या खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट इच्छुक होती. पण त्यानंतर मायक्रोसॉफ्ट शेअरचॅट अॅप खरेदी करू शकते, अशी बातमी मिळाली.
टिकटॉक या सोशल मीडिया अॅपच्या खरेदीचा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. अमेरिकेतील टिकटॉकच्या व्यवहाराच्या खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट ही एकच कंपनी होती. पण आता त्यात ट्विटरनेही उडी घेतली आहे. चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकच्या खरेदीसाठी मायक्रो ब्लॉगिंग ट्विटर यात उतरली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या अंतर्गत एक कार्यकारी आदेश काढला आहे. टिकटॉकला ४५ दिवसांमध्ये अमेरिकेतून व्यवसाय हलवण्याचे निर्देश दिले आहे. टिकटॉकची Parent कंपनी ByteDance पुढे ४५ दिवसांच्या आत करार करावा लागेल, अन्यथा ४५ दिवसांनंतर त्या कंपनीवर अमेरिकेच्या वित्तीय विभागाकडून कारवाई करण्यात येईल, त्यानंतर मग कोणताही व्यवहार करता येणार नाही, असं अमेरिकेने स्पष्ट केलंय.
ट्विटरसाठी टिकटॉकची खरेदी करणे, ही सोपी गोष्ट नाही. कारण ट्विटरच्या तुलनेत मायक्रोसॉफ्ट कंपनी आर्थिक बाजूने खूपच भक्कम आहे. ट्विटरचे सध्याचे बाजार मूल्य 30 अब्ज डॉलर आहे. ट्विटरला त्यांच्या सोबत एखाद्या दुसऱ्या कंपनीला सोबत घ्यावे लागेल. सद्यस्थितीला सर्व गोष्टींचा विचार करता टिकटॉकच्या खरेदीसाठी सर्वात पुढे मायक्रोसॉफ्ट आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पुन्हा ईडी कार्यालयात दाखल
संजय राऊत…कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे- नारायण राण
“मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं हास्यास्पदच”
भगवान परशुरामांची सर्वात मोठी मूर्ती बसवणार; मायावतींचं ब्राम्हण समाजाला आश्वासन
Comments are closed.