बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर खळबळजनक आरोप

मुंबई | मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवण्यात आले? इतके अक्षम्य दुर्लक्ष का? आणि असं करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार?, असे सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिलं आहे.

कोरोना बळी न दाखवता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पारदर्शकता हा एकाच मार्गाद्वारे लोकांना सजक करता येऊ शकतं. मात्र मुंबईत कोरोनामुळे झालेल्या तब्बल 950 मृत्यू हे कोरोना मृत्यू म्हणून दाखवण्यात आले नाहीत. या मृत्युंमुळे मुंबईतील स्थितीची दाहकता या स्थितीमुळे स्पष्ट होतं. असा गैरप्रकार करणाऱ्यांवर आपण कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

राज्यात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी रेकॉर्ड!

सुशांतला दुय्यम लेखलं!; ‘या’ व्हिडीओमुळं ट्रोल होतायेत आलिया भट्ट आणि करण जोहर

सुशांतच्या आत्महत्येनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More