Top News अमरावती महाराष्ट्र

तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना- नवनीत राणा

अमरावती | अमरवतीच्या खासदार नवनीन राणा यांनी तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा केली असल्याची माहिती समजत आहे.

अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा इथल्या जवान कैलास दहीकर यांचा कर्तव्यावर असताना कुल्लू  येथे भारतमातेसाठी शहीद झाले. त्यामुळे दहीकर यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. म्हणून नवनीत राणा यांनी आपला पगार देण्याचा निर्णय घेतला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार नवनीत राणा यांचा खासदारकीचा पगार  शहीद कैलास दहीकर यांच्या आईकडे सुपुर्द करण्यात आला.

दरम्यान, नवनीत राणा आपल्याला अनेक राबवताना दिसतात. त्यामुळे त्या नेहमी चर्चेत असलेल्या आपण पाहिलं आहे. यामध्ये मागे त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन काम करताना आपण पाहिलं होतं. अशातच त्यांनी आपला पगार शहीद कुटुंबाला दिल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

https://fb.watch/2Jy9op8RDy/

थोडक्यात बातम्या-

“छत्रपतींचा महाराष्ट्र फक्त भाषणात नको कृतीत दाखवा, महिला सुरक्षा फक्त घोषणेपुरती”

बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच

“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”

“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या