मुंबई | सोनसाखळी चोरांची सध्या दहशत चांगलीच पसरू लागली आहे. सर्वसामान्य जनतेची लुटमार करणाऱ्या चोरट्यांनी चक्क वार्डाच्या नगरसेविकेलाच लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुसुम रवींद्र म्हात्रे असं भाजपच्या नगरसेविकेचं नाव आहे.
रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुसुम म्हात्रे पायी चालत घरी जात होत्या. यादरम्यान म्हात्रे यांना अज्ञात इसमाने ओ नगरसेवक म्हणून हाक दिली. त्यानंतर त्या थांबल्या आणि बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या अंगावरील दागिने लुटले आणि पसार झाले.
कुसुम म्हात्रे या आपल्या महिला कार्यकर्त्यांसोबत पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या खासगी गाडीने कामोठे वसाहती जवळील महामार्गावर उतरल्या. यावेळी त्यांच्यासोबत 5 ते 7 महिला कार्यकर्त्या देखील होत्या.
दरम्यान, कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
गुजराती किड्यांची मस्ती जिरवावीच लागेल; मनसेचा आता ‘तारक मेहता’विरोधात एल्गार
“विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जातंय”
महत्वाच्या बातम्या-
गुजराती किड्यांची मस्ती जिरवावीच लागेल; मनसेचा आता ‘तारक मेहता’विरोधात एल्गार
“विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जातंय”
मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत; आता केला नवा खुलासा
Comments are closed.