बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार भारताचा ‘अलिबाबा’; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई | सध्याच्या ऑनलाईन काळात खरेदी आपण ऑनलाईन करतो. जेवणापासून कपड्यांपर्यंत सगळं काही ऑनलाईनच मागवलं जातं. एवढंच काय तर पाण्याच्या बाॅटल देखील आजकाल ऑनलाईन मिळतात. भारतात सध्या अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिलसारख्खा ऑनलाईन खरेदी सेवा देणाऱ्या वेबसाईट आहेत. मात्र आता ऑनलाईन खरेदी करणाऱ्या लोकांसाठी नवा स्वदेशी पर्याय उपलब्ध होणार आहे.

भारतात ऑनलाईन खरेदी सेवा देणारं ‘भारत ई मार्केट’ नावाचं स्वदेशी पोर्टल आता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं हे पोर्टल तयार केलं असून या पोर्टलमध्ये 8 कोटी व्यापाऱ्यांचा सहभाग असणार आहे. तर सध्या या पोर्टलमध्ये 7 लाख विक्रेते आहेत. त्याचबरोबर येत्या काळात 1 कोटी विक्रेते या पोर्टलशी जोडण्याचा प्रयत्न असेल.

तर जगातल्या सगळ्यात मोठ्या अलीबाबाच्या कंपनीसोबत सध्या 80 लाख विक्रेते जोडले आहेत. तर अॅमेझाॅनसोबत 5 लाख विक्रेते जोडले गेले आहेत. तर फ्लिपकार्ट सोबत 1.5 लाख व्यापारी जोडले आहेत. या भारत ई मार्केटमध्ये कोणत्याही विदेशी वस्तूंची विक्री केली जाणार नाही. शिवाय हे पोर्टल आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलं आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही हक्कांची बाजारपेठ असेल.

दरम्यान, ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपण्या वेगवेगळ्या क्षेत्रानुसार बाजारात उतरल्या आहेत. हाॅटेल सेवा पुरवणाऱ्या कंपण्या देखील वाढत चालल्या आहेत. तर चांगल्या सेवेसोबतच कंपनीचा ब्रँड तयार करणं हे कंपनीसाठी देखील तितकंच महत्वाचं असतं.

थोडक्यात बातम्या-

“पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”

रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!

मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी

नवऱ्याला खुर्चीला बांधलं, दाखवला पाॅर्न व्हिडीओ आणि धारदार चाकूनं कापला…

‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’; अनिल बोंडे आणि पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची! पाहा व्हिडिओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More