बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘मुख्यमंत्री मंत्रालयात गेले’ ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आलेत”

मुंबई | महाराष्ट्रातील काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तर आज पावसाने नको नको केलं आहे. त्यामुळे या ठिकाणची काही गावं पाण्याखाली गेली आहेत. पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले आहेत. ही माहिती मिळताच प्रसार माध्यमांनी त्याच्यावर बातम्या करायला सुरूवात केली.

याच मुद्यावरून भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात गेेले ही बातमी व्हावी इतके वाईट दिवस महाराष्ट्रावर आले आहेत, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

तसेच मंत्रालयात गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी पाऊस मोठा आहे. त्यामुळे हे संकटही मोठं आहे. परंतू प्रयत्न थिटे आणि नेतृत्व खुजे आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीपेक्षाही पाऊस जास्त कोसळत असल्यामुळे, आपल्याला अतिवृष्टी या शब्दाची व्यख्या बदलावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरूनही भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.  व्याख्या बदलायला सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीही वर्षभर घरी बसून मुख्यमंत्री पदाची व्याख्या बदलली असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या भागातील अतिपावसामुळे नाद्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. अशा नद्यांच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“सतत पाऊस कोसळणाऱ्या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी”

“आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा”

“…अन्यथा मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलन करेल”

“यांना लाजा वाटत नाही का?, एवढी मोठी दुर्घटना घडली तरी एक अधिकारी घटनास्थळी नाही”

राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे प्रसिद्ध ZP शाळा वाबळेवाडीच्या शिक्षकांचे राजीनामे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More