Top News महाराष्ट्र मुंबई

“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”

मुंबई |शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील आपला हार्मोनिअमचा छंद जोपासला आहे. घरात बसून हार्मोनिअमच्या मदतीनं वेळेचा सदुपयोग केल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मला डाऊट होताच यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं, अशा शब्दात निलेश राणेंनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. यापूर्वीही अनेकदा निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते.

आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा म्हणजे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्या-

दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही

ठाकरे सरकारच्या राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण

मोदी सरकार 80 कोटी लोकांना 2 रूपये किलोने गहू आणि 3 रूपये किलोने तांदूळ देणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या