Top News पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आणि राज्यपालांना चाकणकरांनी पाठवला कांदा, व्यक्त केला निषेध

पुणे | राज्यात सध्या कांदा निर्यातीचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आज पुणे सिटी पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांना पाठवण्याचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय.

आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. केंद्रसरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.

निवेदनाच्या माध्यमातून आणि कांदयाचं पार्सल पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलीये.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, “मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण? पंतप्रधानजी, देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार?”

महत्वाच्या बातम्या-

इंदू मिलवरुन कोणीही राजकारण करू नये- उद्धव ठाकरे

…म्हणून संजय राऊत आणि शरद पवारांची भेट घेतली – रावसाहेब दानवे

सुशांतच्या प्रेमापोटी चाहत्याने तयार केला हुबेहुब सुशांतसारखा मेणाचा पुतळा

…तर राजकारणाला रामराम करत खासदारकीचा राजीनामा देणार- उदयनराजे भोसले

शेतकऱ्यांसाठी एनडीए सरकारने केलं तेवढं काम कोणीही केलं नाही- नरेंद्र मोदी

पुण्यातील जम्बो हॉस्पिटल पंधरा दिवसात पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल- आयुक्त विक्रम कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या