Top News महाराष्ट्र मुंबई

प्रेमविवाह करणारांसाठी खूशखबर; उच्च न्यायालयानं दिला सर्वात मोठा निर्णय!

मुंबई |  प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी उच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय घेतला आहे. 18 वर्षावरील सज्ञान मुलगी तिच्या इच्छेनुसार कुठंही जाऊ शकते. तिचे पालक किंवा इतर कोणीही तिच्या स्वातंत्र्यांवर गदा आणू शकत नसल्याचं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मुलानं त्याच्या प्रियसीच्या पालकांविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. परंतू त्यातून काहीही झालं नसल्यानं, त्यानं उच्च न्यायालयात हॅबिस कॉपर्स याचिका दाखल केली. गेले पाच वर्ष त्या मुलाचं आणि मुलीचं एकमेकांवर प्रेम आहे. दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळं मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नास आक्षेप घेतला.

सादर केलेल्या याचिकेवर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याबाबत न्यायालयानं मुलीला विचारलं असता, आपल्याला प्रियकरासोबत रहायचं असून, उर्वरीत आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे.

यावर ‘ती सज्ञान आहे आणि ती तिच्या इच्छेनुसार कुठंही जाऊ शकते. आम्ही किंवा तिचे पालक तिच्या या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती तिच्या मर्जीनुसार वागू शकते’, असं न्यायालयानं सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-47 घेऊन फिरत आहेत’; ‘या’ भाजप खासदाराचा दाव

भाजपने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलं ‘हे’ नवीन नाव!

“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या