बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी प्रवास महागणार, इंधन दरवाढीचा आता प्रवाशांनाही बसणार मोठा फटका

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरमध्ये वाढ होत आहे. याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अशातच आता दरवाढीमुळे एसटी प्रवास करणाऱ्यांसुद्धा यापासून सुटका मिळणार नसल्याचं चित्र दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे आता एसटी प्रवास देखील महागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इंधन दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला मोठा तोटा झाला आहे. सुमारे 12500 कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला झाल्याने एसटी तिकीटांच्या किंमती 17 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाकाळात प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा झाला. त्यामुळे 12 तास काम करुनसुद्धा अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. गेल्या 4 दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला आहे.

दरम्यान, दिवाळी तोंडावर आली आहे. अशातच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लक्झरी बसचा महागडा प्रवास न परवडणाऱ्या प्रवाशांना लाल एसटी हा एक मोठा आधार आहे. मात्र आता एसटीच्या संपाने लोकांची चिंता वाढवली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, इथे अधिकारी तुझी…,’ समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावलं

कच्च्या तेलाच्या दरात घसरण पण पेट्रोल आणि डिझेलचे दर…

“ओ भाई… मारो मुझे… मारो” म्हणणारा मुलगा आठवतोय? तो आता परत आलाय, पाहा काय म्हणाला

भरसभेत छगन भुजबळांनी दिलं किरीट सोमय्यांना खुलं आव्हान, म्हणाले…

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…, नितीन राऊतांच्या ट्विटवर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रीया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More