Top News महाराष्ट्र मुंबई

“पवार साहेबांचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी पाटलांना…”

मुंबई | राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही मनीषा प्रत्येकाचीच असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पाटलांना टोला लगावला.

मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल, असा उपरोधिक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी पाटील यांना हाणला आहे.

पाटलांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटत नाही. पवार साहेबांचंच कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबाला संधी देता-देता जयंत पाटलांना शंभर वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वरापाशी मागावं लागेल, असं मुनगंटीवार म्हणाले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, जयंत पाटलांनी जी काही इच्छा प्रदर्शित केली आहे त्याला मी पाठिंबा देतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका पाहण्याचा विचार करताय?; थोडं थांबा BCCI देणार गुडन्यूज!

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार काॅंग्रेसचा मोर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘या’ अभिनेत्रीचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या