बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

पुणे |  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं होतं. दुसऱ्या लाटेवेळी राज्यातही अनेकांनी आपले प्राण गमावले. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्रिपदावरून राज्याच्या गाडा चांगल्याप्रकारे हाकला. याच पार्श्नभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. अशा काळात त्यांच्या सारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिलं आहे. पुण्यात शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोरोनाकाळात शिवसेनेने लोकांना मदत केली आहे. शिवसेना सत्तेत आली आणि एक सुवर्णपान उलगडलं गेलं. कोणत्याही नेतृत्वासाठी, पक्षासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पडत्या आणि वाईट काळात संघटन आणि नेतृत्व कसं आहे हे कळतं. तसंच ते सत्तेत असतानाही कळत असल्याचं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी ईडीच्या सुरू असलेल्या कारवायांवरही भाष्य केलं.

दरम्यान, ईडीच्या कारवाया वेळा साधून होत आहेत त्यामुळे त्यावर प्रश्न निर्माण होत आहे. ठराविक पक्ष आणि लोकांवरच कारवाया होत आहेत हे जास्तच साधून आल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! चालू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

“तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण…”

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

“दैनिक सामनाचा संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहेत”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More