सोलापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचं कार्य मोठं आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणं योग्य ठरणार नसल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यावेळी त्यांनी माध्यमांशा संवाद साधला.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील. धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणाची सत्यता पडताळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असंही भरणे म्हणाले.
दरम्यान, एखाद्याने तुमच्यावर आरोप केले तर पोलीस लगेच गुन्हा दाखल करू शकत नाहीत त्यापूर्वी सत्यता पडताळावी लागत असल्याचंही भरणे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी
“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”
ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स
गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…
कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य म्हणाले…