बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमच्या आमदाराला त्रास देत असतील तर…’; शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राऊतांनी तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावरुन संजय राऊत थेट सिल्व्हर ओकवर जात पवरांची भेट घेतली. त्यांची 20 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत काय झालं यावर आपली संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रकरणात त्रास दिला जात आहे. यासंदर्भात बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब आणि मी उपस्थित होतो. जर आमचा आमदार अडचणीत आला असेल आणि त्याला विनाकारण त्रास देत असतील तर काय मार्ग काढावा हे पाहावं लागेल. पक्ष पूर्णपणे प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे आणि राहणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत पक्षाचे नेते आहेत आणि खासदार आहेत त्यामुळे काही कारणास्तव आम्ही भेटलो त्यात आश्चर्य काय?, सरकार अस्थिर होईल या भ्रमात कोणी राहू नये. मीडियाच्या माध्यमातून भ्रम निर्माण केले जात आहेत म्हणून वारंवार सांगावे लागते कारण तुम्हाला आता कृतीतूनच दिसेल की सरकार किती गंभीर आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, दिल्लीच्या बैठक यांचा इथे परिणाम होत नाही. महाविकास आघाडी सरकार स्वबळावरच आले आहे आणि राजकीय पक्ष स्वबळावर आले आहेत. या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी रोजच भेटत होतो, आता ते मुख्यमंत्री आहेत. आम्ही रोज भेटतो, रोज फोनवर बोलतो चर्चा करत असल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्याचं मशीन, चार महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं”

हिंदी चित्रपट अश्लिल, फाॅलो करणं बंद करा – इम्रान खान

नारदा स्टींग प्रकरणी ममता बॅनर्जींचं उच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल

कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे; भारताचा लसीकरणात नवा उच्चांक

देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल- भाजप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More