बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविड सेंटरमध्येच रेमडेसीवीरचा काळाबाजार, पोलीस कारवाईत धक्कादायक गोष्टी उघड

पुणे | राज्यात कोरोनावर गुणकारी असलेल्या ‘रेमडेसीवीर’ औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे बेहाल होत असताना दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच ‘रेमडेसीवीर’ची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हे उघडकीस आलं आहे.

कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारीचं ‘रेमडेसीवीर’ पुरवत असल्याचं तपासातून निष्पन्न झालं असून, कुंपणच शेत खातं असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनसह तब्बल 1 लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासतोय. अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावं लागलं. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्षांमध्ये जुंपली आहे. अशात केंद्र सरकारने पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

थोडक्यात बातम्या- 

IPL 2021- …म्हणून हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘लोक पोलिसांना चोपून काढतील अन् मारामारी झाली तर…’; उदयनराजे भोसले आक्रमक

कार चालकाने अचानक दरवाजा उघडला, दुचाकीस्वार रस्त्यावर आडवा, भरधाव बसने चिरडलं

…अन् खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कटोरा घेऊन बसले रस्त्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More