Top News आरोग्य कोरोना देश

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

तिरूवनंतपुरम | कोरोनाचा विळखा वाढत असताना केरळ राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं केरळ राज्य सरकारने जाहीर केलं आहे.

पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने हा निर्णय लागू केला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील अनिवार्य असणार आहे. प्रत्येक ठिकाणी 6 फूट अंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागणार असल्याचं केरळ सरकारने सांगितलं आहे.

व्यावसायिक आस्थापनांमध्ये तसंच दुकानांमध्ये एकावेळी 20 पेक्षा अधिक ग्राहक जमा होऊ देऊ नये. त्याबरोबर सर्व ग्राहकांना 6 फूट सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते किंवा फुटपाथवर थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

लग्न आणि अंत्ययात्रेचे नियम सुद्धा शासनाने घालून दिलेले आहे. लग्न समारंभात 50 लोकं सहभागी होऊ शकतात. त्यासोबत अंतयात्रेत फक्त 20 लोकं सहभागी होऊ शकतात.

ट्रेंडिंग बातम्या-

आम्‍ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी!

कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

देशात कोरोनाचा धुमाकूळ, आतापर्यंतचा सगळ्यात उच्चांकी आकडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या