बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री म्हणून ‘हा’ निर्णय सर्वाधिक समाधान देणारा- मुख्यमंत्री

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात खास पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री झाल्यावर घेतलेला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय समाधान देणारा होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता. कर्जमुक्ती योजनेचे काम व्यवस्थित सुरू आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पूर्वीप्रमाणे त्यांना हेलपाटे मारावे लागले नाहीत. रांगेत उभं राहावं लागलं नाही,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांतील 5 लाख शेतकऱ्यांची यादी तयार आहे. मात्र आचारसंहितेमुळं आम्ही ती लावू शकलेलो नसल्याचं ठाकरेेंनी सांगितलं.

दरम्यान, शेतकरी आपल्या पायावर उभा कसा राहील? त्यासाठी आणखी काही योजना आखता येतील का? ते आम्ही पाहत आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईची भाषा मराठीच; चंपक चाचाने मागितली जाहीर माफी

विद्या चव्हाणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; सुन डॉ. गौरी चव्हाणांची टीका

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत- राहुल गांधी

मुख्यमंत्रिपद जाताच देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं पुस्तक; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रकाशन

मोदींनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णायाचं रोहित पवारांकडून कौतूक पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More