बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

पुणे । आपण अनेकदा छोट्या मुलांना खेळताना एकटं सोडून देतो. पण यावेळी झालेलं दुर्लक्ष त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. गॅलरीत खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अथर्व दीपक गावडे हा त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तेव्हा त्यांची घरात काम करण्यात व्यस्त होती. भावासोबत खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला. गॅलरीतून तो खाली डोकावून पाहत होता, त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि अथर्व थेट खाली जमिनीवर पडला.

लहान भावाने आईला ही घटना सांगितल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. अर्थवला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

दरम्यान, अशीच एक घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली होती. शिवाजी नगर भागात दोन वर्षीय चिमुकल्याचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता. गौरव शेवाळे या चिमुकल्याचा 30 जुलै रोजी मृत्यू झाला होता.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी स्टेडियम आपल्या नावावर करून घेतलं”

काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

…अन् त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारून वडिलांच्या केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”

चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More