बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!

अमरावती | राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता चॉकलेटचं आमिष दाखवून 12 वर्षीय अल्पवयीन बालिकेसोबत अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत हा संतापजनक प्रकार घडलाय. 12 वर्षीय बालिकेने कशीबशी नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आपल्या अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांत दिली आहे.

पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून विजय जवंजाळ या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केलाय. पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरुन बाल लैंगिक कायद्या अंतर्गत नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळ याला अटक केली आहे.

आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाचा शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन- नितेश राणे

“देश नहीं बिकने दूंगा म्हणत मोदी सरकार एक एक करत सर्व विकतंय”

चिंताजनक! पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना

कोरोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांनी मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

पाॅवर कट बत्ती गुल ; महावितरणाच्या कारवाईनं शेकडो गावं अंधारात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More