…तर 125 कोटी भारतीयांचं नाव बदलून ‘राम’ ठेवा!

लखनऊ | देशातील महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारण्यासाठी शहरं आणि जिल्ह्यांची नाव बदलण्याची उठाठेव सुरु आहे, असा आरोप पाटीदार नेते हार्दीक पटेल यांनी केला आहे. ते एका सभेत बोलत होते.

सीबीआयमधील अंतर्गत वाद, आरबीआयची स्वायत्तता, राफेल घोटाळा, असे विषय देशासमोर आहेत. परंतू या मुद्द्यांपासून लोकांचं दुर करण्यासाठी हे सरकार राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप आणि संघ दोन्ही मिळून देशातील वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, फक्त जागांची नावं बदलून देश संपन्न होणार असेल, तर 125 कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुलीकडं एकटक पाहून डोळा मारणं महागात; तरुणाला 3 वर्षांची सक्तमजुरी

-राहुल गांधींविरोधात सावरकर कुटुंबियांची पोलिसांत धाव!

-मुनगंटीवारांचं वनमंत्रीपद काढून घ्या; मनेका गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-नेस्ले इंडियाची मोठी घोषणा; आता मॅगीचं पाकीट चक्क फुकट मिळणार!

-भाजपसाठी धोक्याची घंटा; लोकसभेतील जादूई आकडा गमावला