गडचिरोली | 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संपुर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. गडचिरोली जिल्ह्यात काही संघटना किंवा नक्षलवादी यांच्याकडून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 15 दिवस जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 37 एक आणि तीन अन्वये अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहे.
प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय पक्ष, इतर काही संंघटना, उत्सव, सभा आणि मिरवणूक इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत गडचिरोलीमध्ये जमावबंदी असणार आहे.
नागरिकांना शरिराला कोणतीही इजा करता येईल, अशा प्रकारची शस्त्रास्त्रे वापरण्यावर बंदी असणार आहे. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका किंवा लाठ्या काठ्या बाळगता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर काही क्षेपणास्त्रे सोडण्याची किंवा फेकण्याची उपकरणेही सोबत ठेवता येणार नाही.
दरम्यान, जिल्ह्यात कोणीही पुर्वपरवानगीशिवाय मिरवणुक काढू नये, अशी सुचना देण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक लोक सार्वजानिक जागेवर किंवा सार्वजानिक रस्त्यावर 26 जानेवारी दुपारी एक वाजल्यापासून सार्वजानिक जागेवर जमा होणार नाहीत किंबहुना कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. जाहिरपणे घोषणा देणे, आवेशपुर्ण भाषण करणे, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करण्याला बंदी असणार आहे.
थोडक्यात बातम्या-
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची ही 5 लक्षणं समोर; लगेच व्हा सावध!
“2024ला नरेंद्र मोदींविरूद्ध प्रियंका गांधी पंतप्रधानपदाच्या दावेदार”
काँग्रेसला धक्क्यावर धक्के! स्टार प्रचारकानेच केला भाजपमध्ये प्रवेश
“किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करतात”
प्रत्येकाला ओमिक्राॅन होणार का???; WHOने दिली महत्त्वाची माहिती
Comments are closed.