नवी दिल्ली | कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. अशात इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचं होतं. मायदेशी परतता येईल की नाही ही चिंता त्यांना लागून राहिली होती. मात्र ही चिंता आता संपली आहे. कारण कोरोनाच्या दहशतीत जगणाऱ्या 236 भारतीयांना मायेदशी आणण्यात आलं आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसंच या 236 जणांमध्ये 131 विद्यार्थी आहेत, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.
44 प्रवाशांना इराणहून भारतात आणलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत एकूण 236 भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आलं आहे. यासाठी जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत.
इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे 100 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. मात्र अखेर त्यांची ही चिंता मिटली आहे.
Indian Army:Wellness Centre at Jaisalmer is fully equipped facility to help Indian citizens undertake mandatory quarantine period under the supervision of skilled medical authorities. Soldiers have volunteered to provide care and support to our countrymen returning from overseas https://t.co/2Ceuu27BLR
— ANI (@ANI) March 15, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘कोरोना’बाबत खबरदारी! बस कंडक्टरने प्रवाश्यांना वाटले मास्क
16 मार्चला ठरणार कमलनाथ सरकारचं भवितव्य
महत्वाच्या बातम्या-
मध्य प्रदेशनंतर ‘या’ राज्यात काँग्रेसला धास्ती; 14 आमदारांची जयपूरला रवानगी
कोरोनामुळे मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
Comments are closed.