बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, 25 पेक्षा जास्त आमदारांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. यावरून भाजपने (BJP) महाविकास आघाडीला पुरतं घेरलं आहे. त्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात सर्व काही अलबेल नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात.

महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा रंगत असताना महाविकास आघाडीतील आमदारांनी मोठं पाऊल उचललं आहे. महाविकास आघाडीतील मुख्यत: काँग्रेसमधील (Congress) 25 आमदारांनी स्वपक्षाबद्दल नाराजीचा सूर आवळल्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस मंत्र्यांकडून आमच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मतदारसंघात विकासकामे करायची आहेत पण त्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या विनंतीकडे मंत्री दुर्लक्ष करत आहेत, अशी तक्रार या आमदारांनी पत्र लिहित थेट सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) केली असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान, पक्षाकडूनच आपल्या आमदार आणि नेत्यांच्या समस्या, तक्रारींडे दुर्लक्ष झाले तर निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली कशी होईल, असा सवाल देखील या आमदारांनी उपस्थित केला आहे. तर याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल, असं देखील या आमदारांचं मत आहे.

थोडक्यात बातम्या-

1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवणार पण…; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा आवाज कोणी बंद करू शकणार नाही”

‘रशियन सैनिकांनी माझ्या पतीला गोळी मारली आणि मग माझ्यासोबत…’, युक्रेनियन महिलेच्या दाव्यानं खळबळ

“… त्यामुळे भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे”

मोठी बातमी! कोरोना निर्बंधांबाबत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More