बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेलंगणातून चिंता वाढवणारी बातमी समोर, तब्बल ‘इतके’ विद्यार्थी सापडले पॉझिटीव्ह

नवी दिल्ली | देशासह सध्या जगभरात ओमिक्रॉनने (Omricon Varient) दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरियंटने आता भारतातही प्रवेश केला आहे. काल कर्नाटक मध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले आहेत. (2 Omricon Patients Found In Karnataka) त्यामुळे सध्या देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच तेलगंणामधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तेलगंणामध्ये संगारेड्डी जिल्ह्यातील एका शाळेत तब्बल 27 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंद्रहेम गावातील महात्मा ज्योतिबा फुले शाळेत हा प्रकार घडला आहे. 250 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 27 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे शालेय प्रशासनाची चिंता वाढली आहे.

तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची ही 4 थी घटना आहे. 3 दिवसांपूर्वीच संगारेड्डी जिल्ह्यातील मुतंगी येथील गुरुकूल शाळेत 46 विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. तर त्याआधी महिंद्रा शाळेत 25 विद्यार्थ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. तेलंगणामध्ये सर्व काळजी घेत 1 संप्टेंबरला शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या या 27 विद्यार्थ्यांना वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय काही विद्यार्थ्यांचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत. मात्र, सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“अमरावतीत झालेला प्रकार संयोग नव्हे तर प्रयोग होता”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

Whatsappचा भारतीयांना जोरदार झटका, केली ‘ही’ मोठी कारवाई

चिमुकली हट्टाला पेटली अन् फडणवीस काकांनी पुरवला ‘तो’ बालहट्ट; पाहा व्हिडीओ

“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More