बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

रत्नागिरी | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याने महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू म्हणजेच डेल्टा प्लस हा डोकं वर काढत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नुकतच आयसीएमआरच्या प्रमुखांनी डेल्टा प्लस हा विषाणू धोकादायक नसल्याचं सांगितलं होतं. तसेच याबाबतचा संशोधन करून अहवाल केंद्र सरकारला दिल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील तीन चिमुकल्यांनी डेल्टा प्लस या विषाणूवर मात केल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे.

दरम्यान, डेल्टा प्लस या नव्या विषाणूने बाधित झालेले तीन, चार व सहा वर्षांच्या चिमुकल्यांनी डेल्टा प्लस या विषाणूवर मात केली असून ते कोरोनामुक्त झाल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे देशातील सर्वाधिक म्हणजेच 34 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना आता या लहानग्यांनी डेल्टा प्लसवर मात केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

देशात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 66 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून आल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक डेल्टा प्लसचे रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये आढळून आले आहेत. त्यापैकीच संगमेश्वरच्या तीन मुलांनी या विषाणूवर यशस्वी मात केली आहे.

थोडक्यात बातम्या

जॅकी श्राॅफच्या मुलीचा लुक पाहून सर्वच झालेत हैराण, चाहते देखील म्हणाले… पाहा फोटो

“विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा काँग्रेसला पाठिंबा”

मोठी बातमी! 24 तासात जम्मू-काश्मिरात आढळून आले 2 संशयास्पद ड्रोन

अन् त्या महिलेवर कॅमेरा फोकस होताच प्रेक्षकांनी सुरू केला टाळ्यांचा कडकडाट

“आता वाटायला लागलंय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More