बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

अहमदनगर | आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात झाली. घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर राज्यभरातील धार्मिक आणि प्रार्थनास्थळाची दारं आता खुली झाली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरला असल्याने राज्य सरकारने बंद प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाची भीती अजूनही कायम आहे. राज्यभर मंदिरं उघडली तरी 6 मंदिरात मात्र कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाची भीती लक्षात घेता, जिल्ह्यातील 6 मंदिरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष दर्शन बंद असलं तरी भाविकांना ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत.

ज्या मंदिरात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे त्या मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता मंदिरात कलम 144 लागू करण्यासह मंदिराबाहेर खेळणी किंवा इतर दुकानं लावण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. हे नियम आजपासून 20 तारखेपर्यंत कायम राहणार असल्याचं राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं आहे.

या मंदिरात कलम 144 लागू –

  1. रेणूका माता देवी मंदिर, केडगांव, ता. अहमदनगर
  2. रेणूका माता देवी मंदिर, एम.आय.डी.सी, अहमदनगर
  3. श्री. जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे,ता पाथर्डी (मोहटा देवी मंदिर)
  4. तुळजा भवानी मंदिर, बु-हाणनगर ता.अहमदनगर
  5. रेणूका माता देवी मंदिर, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, अहमदनगर
  6. श्री. जगदंबा देवी मंदिर, राशीन,ता. कर्जत

 

थोडक्यात बातम्या-

अखेर मंदिरांची दारं उघडली; असा करता येणार मंदिरात प्रवेश

पहाटे भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं पाकिस्तान, 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

पुणे मेट्रोसंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

”अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?”

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More