बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲाडी कारला भीषण अपघात, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

बंगळुरू | कर्नाटकमध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. भयानक अपघातामध्ये जागीच सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  मृतांमध्ये तामिळनाडू राज्याचे विधानसभेचे आमदार वाय. प्रकाश यांच्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला आहे.

कर्नाटक राज्याच्या बंगळुरुतील कोरमंगलामध्ये मध्यरात्री हा अपघात झाला आहे. यामध्ये आमदारांच्या ऑडी कारचा चक्काचूर झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे वेगात असलेली कार विजेच्या खांबाला धडकल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की सहा जणांना जागीच मृत्यू झाला तर एकाचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला.

तामिळनाडूच्या होसुर मतदारसंघाचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा आणि सुन गाडीत होते. करूण सागर हे वाय प्रकाश यांच्या मुलाच नाव आहे. करूण सागर आपल्या पत्नी आणि मित्रांसमवेत या गाडीत होते. क्यू3 या श्रेणीच्या ऑडी गाडीतुन ते प्रवास करत होते.

दरम्यान, चार पुरूष आणि तीन महिला होत्या. हे सर्वजण 25 ते 30 वयोगटातील होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीमधील एकाही व्यक्तिने सेफटी बेल्ट लावला नसल्याची माहिती घटनास्थळावरील पोलिसांनी दिली.

थोडक्यात बातम्या 

बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कुंडलिका नदीला पूर

श्रीलंकेच्या ‘या’ गाण्याने घातली भारतीयांना भुरळ; सोशल मीडियावर रिल्सचा धुमाकूळ

चौकशीला दांडी मारत नारायण राणे दिल्लीला रवाना; वकिलांनी दिलं ‘हे’ कारण

जळगाव जिल्ह्यात पुराचं सावट; नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

‘…म्हणून सांगतो चड्डीत राहायचं’; नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More