Top News राजकारण

अखिलेश यादव यांची भेट घेणारे 7 आमदार बसपामधून निलंबित

उत्तर प्रदेश | बहुजन समाज पार्टीच्या 7 आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. तर या 7 आमदारांना बसपातून निलंबित करण्यात आलंय.

बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या, “विधान परिषद निवडणुकीत सपाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी बसपा पूर्ण ताकद लावणार आहे. याप्रसंगी भाजपा आणि अन्य कोणत्याही विरोधी पक्षाला मत देण्याची वेळ आली तरी चालेल.”

दरम्यान मायावती यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सपाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले की, मायावती यांच्या विधानावरून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी असल्याचं स्पष्ट होतंय.

403 सदस्यीय विधानसभेत बसपाचे 18 आमदार आहेत. यापैकी सात आमदारांनी बुधवारी राज्यसभा उमेदवार रामजी लाल गौतम यांना विरोध दर्शवला. त्यानंतर मायावती यांनी आपल्या पक्षातील सात आमदारांना निलंबित केलंय. दरम्यान या आमदारांनी इतर कोणत्याही पक्षात जाण्याची योजना नसल्याचं सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचा 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रह

हम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या