औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर | मराठा आरक्षणासाठी आंदोलक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. आज लातूरमध्ये 8 आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. 

औसा तहसील कार्यालयाच्या दालनात मराठा क्रांती मोर्चानं जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं. तेव्हा मोर्चाच्या 8 आंदोलकांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. 

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरूच आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत?

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

-चाकण जाळपोळ प्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या