नवी दिल्ली | अनेक स्टारकिड्स सध्या बाॅलिवूडमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. किंबहुना काही असे स्टारकिड्स आहेत जे त्यांच्या अभिनेता-अभिनेत्री आई-वडिलांपेक्षाही प्रसिद्ध झाले आहेत. सलमान खान(Salman Khan), अमीर खान, करीना कपूर खान हे काही स्टार किड्स आहेत जे त्यांंच्या पालकांपेक्षा जास्त प्रसिद्ध झाले आहेत.
काही अभिनेता-अभिनेत्रीच्या मुलांनी मात्र यापासून दुर राहणं पसंद केलं आहे. अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन, अभिनेता टायगर श्रॉफ यांची बहिण आणि अभिनेता जॅकी श्राफ यांची कन्या कृष्णा श्राफ अशी काही उदाहरणे देता येतील. यातीलच एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन यांचा मुलगा वेदांत माधवन हा होय. वेदांतनेही त्यांचं करिअर फिल्म क्षेत्रात न करता स्विमिंगमध्ये करिअर करत आहे.
नुकताच त्यांने 1500 मीटर फ्रीस्टाईल प्रकारातील लहान गटाचा राष्ट्रीय विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. कौतुकास्पदबाब म्हणजे त्यांनं सुर्वणपदक (gold medal) जिंकलं आहे. वेदांतच्या या कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांचा या कामगिरीचा व्हिडीओ आर. माधवन यांने त्यांच्या ट्विटर हॅँडलवर टाकला आहे. त्यातं त्यानं ‘कधीही नाही म्हणू नका. 1500 मीटर फ्रीस्टाईलचा राष्ट्रीय ज्युनियर विक्रम मोडला, असं कॅप्शन दिलं आहे.
यापूर्वीही वेदांतने असे रेकाॅर्ड केले आहेत. अलीकडेच त्यांने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धत सुर्वण पदक जिंकलं आहे. दरम्यान आर. माधवन बद्दल बोलायचं झालं तर सध्या त्यांचा रॅाकेट्री (Rocketry) हा सिनेमा चर्चेत आहे.
Never say never . 🙏🙏🙏❤️❤️🤗🤗 National Junior Record for 1500m freestyle broken. ❤️❤️🙏🙏@VedaantMadhavan pic.twitter.com/Vx6R2PDfwc
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 17, 2022
थो़डक्यात बातम्या
हा कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे’; राऊतांनी शिंदे गटाची उडवली खिल्ली
उद्धव ठाकरेंकडून कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी
आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; महत्त्वाची माहिती समोर
SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय
एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर!
Comments are closed.