बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू! मंदिरातून येताना दोन मुलींसोबत झालं मन हेलावून टाकणारं कृत्य

भोपाळ |  मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. देवावर श्रद्धा ठेवून तो आपल्या नेहमी पाठीशी असतो असा समज जवळपास प्रत्येक माणसाचा असतो. या कारणामुळे अनेक लोक मनोभावे त्याची भक्ती करतात. मग मंदिरातून येताना अनेक दुर्घटना होतात आणि विश्वासाला तडा बसतो. अशातच मंदिरातून परत येताना दोन मुलींवर धक्कादायक कृत्य करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पीडित मुलींमध्ये पाच वर्षांच्या आणि अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. छतरपूर जिल्ह्यातील प्रकाश ब्रह्मोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. गावातील दोन मुली अन्य मुलींसोबत मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून निघाल्यानंतर परिसरात एक तरूण त्यांच्याकडे गेला.

मुलींना आपण घरी सोडतो असं सांगून तो त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला. त्याच वेळी त्याने आजुबाजूला कोणीच नसल्याचा फायदा घेऊन मुलींवर बलात्कार केला. घटनेनंतर संबंधित आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलींनी घडलेला हा सर्वप्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून संबंधित आरोपीचा देखील शोध सुरु आहे. काही दिवसांपुर्वी एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. तसेच या घटनेमधील संबंधित आरोपीच्या विकृतीचा शिकार बनलेल्या चिमुकलीचं वय केवळ 5 वर्ष आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील तरुणीशी आधी इन्स्टाग्रामवर ओळख, त्यानंतर तिच्याच घरात घुसून केलं संतापजनक कृत्य

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह

अबब… बाॅसने छेडल्यानंतर मुलीने केला असा प्रतिकार; व्हिडीओ पाहुन व्हाल थक्क

“संजय राऊत हे गडकरींनाच काय अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात”

दिलासादायक! येत्या 5 दिवसात रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More