बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हॉटेलमध्ये घुसली भलीमोठी पाल, महिला वेटरनं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

कैनबरा | पाल म्हणलं की भल्या-भल्या महिला घाबरतात. छोटी पाल जरी घरात दिसली तरी महिला नाहीतर तरुणी घर डोक्यावर घेतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक भली मोठी पाल रेस्टाॅरंटमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे ही पाल हाॅटेलमधून बाहेर काढण्यासाठी त्या हाॅटेमधील एका महिला वेटरेसने जे केलं ते पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.

संबंधित व्हिडीओ हा ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा येथील एका रेस्टाॅरंमधील आहे. या रेस्टाॅरंटमध्ये एक भल्या मोठ्या पालीने शिरकाव केला. विशेष म्हणजे या पालिने जेव्हा तिथं शिरकाव केला तेव्हा तेथं अनेक ग्राहक होते. या ग्राहकांपैकी अनेक ग्राहक या महिला होत्या. पालीला पाहून एक महिला तर चक्क टेबल वर चढली. मात्र हाॅटेमध्ये कामाला असलेल्या एक महिला वेटरने या पालीच्या शेपटीला पकडून तिला हाॅटेलमधून बाहेर काढलं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2.5 मिलीयन व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात फाॅरवर्ड देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणाचा स्टंट, कधी कोणाची कला. अशातच या व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. तसेच हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

नवविवाहीत नवरीने केलेल्या ‘या’ कृत्याने नवराच नाही तर संपूर्ण सासरवाडीला हादरवून सोडलं!

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री

अभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण!

हृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More