बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल

नवी दिल्ली |  कोरोना प्रतिबंधासाठी सध्या लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे. देशात सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. आता 18 वर्षावरील व्यक्तींना मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. कोविशिल्ड लसीची अँटीबाॅटी तयार करण्यासाठी लागणारा वेळ हा कमी असल्यानं दुसऱ्या डोसचा कालावधी 84 दिवसांवर करण्यात आला होता. आता याच नियमांसंदर्भात केंद्र सरकारने काही जणांना सूट दिली आहे.

टोकियो ऑलिंपिकला जाणारे खेळाडू, परदेशात जाणारे विद्यार्थी, व्यावसायिक तसेच इतर खेळाडूंना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचे नियम बदलले आहेत. जर एखादी व्यक्ती परदेश दौऱ्यावर जाणार असेल, तर अशा परिस्थितीत कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर कधीही दिला जाऊ शकतो. सध्या कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे.

परदेशी प्रवासासाठी कोविशील्ड लस घेतलेल्यांना लस प्रमाणपत्र देण्यात येईल. लसीकरण प्रमाणपत्रात पासपोर्ट क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांना 31 ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. ही सुविधा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे.

दरम्यान, काही नागरिकांसाठी या नियमात बदल केले असले तरी बाकीच्या नागरिकांना 84 दिवसानंतरच लस घेता येणार आहे. परदेशात जास्त दिवस जाणार असल्यानं त्यांच्या शरिरातील अँटीबाॅडीज तयार होण्याची प्रकिया बिघडते. त्यामुळे त्यांना या नियमात सुट देत नियम बदलण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

थट्टा नशिबानं लावली! वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा झाला कोळसा

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More