पुतिन यांना मनोरूग्ण म्हणणाऱ्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह
मॉस्को | रशियन मॉ़डेल (Russian Model) ग्रेटा वेडलर (Gretta Vedler) हीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या मॉडेलने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर उघडपणे टीका केली होती. साधारण वर्षभरापूर्वी पुतिन यांना मनोरूग्ण म्हणल्याने ग्रेटा प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
ग्रेटा वेडलर ही गेल्या एक वर्षापासून बेपत्ता होती. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, ग्रेटाची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविन (Dimitry Korovin) याने केली आहे. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबत तिची हत्या केली व तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रंकेत ठेवला. धक्कादायक म्हणजे कोरोविन तीन रात्र ग्रेटाच्या मृतदेहासोबत हॉटेलच्या खोलीत झोपला होता.
ग्रेटाचा खून झाला असल्याचं किंवा ती गायब असल्याचं कोणाला कळू नये यासाठी तो तिचं सोशल मीडिया पेज अपडेट करत होता. कोरोविनने हत्येची कबूली दिल्यानंतर ही हत्या राजकीय वादातून नाही तर पैशाच्या वादातून झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) ग्रेटा वेडलरचा मृतदेह सापडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ग्रेटाची हत्या राजकीय वादातून तर झाली नाही ना?, असा प्रश्न अनेकांना पडला असताना ग्रेटाच्या एक्स बॉयफ्रेंडने हत्येचा गुन्हा कबूल केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘इस्लाम धर्मच हिंदुस्थानाचा खरा शत्रू’, संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य
‘फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली म्हणजेच…’, जयंत पाटलांचा खोचक टोला
आनंद महिंद्रांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, वाचा नेमकं कारण काय?
नवाब मलिकांना सोडविण्यसाठी मागितली ‘इतक्या’ कोटींची लाच, मलिकांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
“महाराष्ट्रातही आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही”
Comments are closed.