बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंतराळात बनणार पार्क; ‘ही’ प्रसिद्ध व्यक्ती करणार प्रवास

नवी दिल्ली | बघितलेली स्वप्न कधी पूर्ण होतील हे सांगता येणं अवघड आहे. असं अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचा बाबतीत झालं आहेत. त्यांनी बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजनच्या न्यू कॅप्सूल मधून चक्क 11 मिनिटासाठी अंतराळाच्या प्रवासासाठी जाणार आहेत.

बेझोस हे येत्या 20 जुलै रोजी अंतराळ प्रवासावर जाणार आहे. या प्रवासात त्यांचे भाऊ मार्क बेझोस देखील असणार. मी वयाच्या 5 व्या वर्षांपासून अंतराळ प्रवास करण्याचं स्वप्न बघत आलोय, असं त्यांनी सांगितलं. वयाच्या 18 व्या वर्षी पाहिलेल्या या स्वप्नाचा पाठलाग करत असताना जेफ बेझोस यांनी सन 2000 मध्ये ब्लू ओरिजीन नावाच्या एरोस्पेस कंपनीची सुरुवात केली. या कंपनीच्या माध्यमातून अंतराळात एक कॉलनी वसवण्याचं बेझोस यांचं स्वप्न आहे.

1982 मध्ये जेफ प्रिन्सटन विद्यापीठात शिक्षण घेत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या वर्गात प्रथम स्थान पटकावलं होतं. पदवीच्या भाषणादरम्यान ते त्यांच्या स्पेस ड्रीमबद्दल बोलले होते. जेफ 680 विद्यार्थ्यांमधून पहिले आले होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेवर कोणालाही शंका नव्हती.

दरम्यान, अंतराळ पर्यटनाचं स्वप्न पाहण्यामागचा जेफ यांचा हेतू हा पृथ्वीला वाचवणं हा होता. त्यांची इच्छा पृथ्वीचे ग्लोबल वॉर्मिंग पासून संरक्षण करण्याची आहे यासाठी त्यांनी बेझोस अर्थ फंड नावाची संस्था देखील बनवली आहे. येत्या 20 जुलै रोजी ते हा अंतराळाच्या प्रवास करणार असून त्यांचा हा प्रवास 11 मिनिटाचा असेल.

थोडक्यात बातम्या-

“तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

‘भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता- असीम सरोदे

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ, कोरोनाबळी पुन्हा नऊशेपार

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More