‘आधार’पासून देशाला धोका, सुब्रमण्यम स्वामी मोदींना पत्र लिहिणार!

नवी दिल्ली | आधार कार्डपासून देशाला मोठा धोका आहे, असं भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

प्रत्येक गोष्टीला आधार अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालय फेटाळून लावेल, असा दावाही स्वामींकडून करण्यात आलाय. 

दरम्यान, केंद्र सरकारने आधार जोडण्याची मुदत वाढवलीय. आता ही मुदत 31 मार्च 2018 असणार आहे. मात्र तत्पूर्वी न्यायालय याप्रकरणी काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.