बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीची महिला पोलीस हवालदारानं काढली आरती, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अनेक लोक कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. अशातच मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्याची महिला पोलीस हवालदारानं चांगलीच शिक्षा दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक माणूस विनामास्क उभा आहे आणि महिला कॉन्स्टेबल एक पूजेचे ताट घेऊन त्याची आरती करत आहे. महिला कॉन्स्टेबलने त्याची आरती ओवाळल्यानंतर त्याच्यावर फुलं आणि अक्षताही टाकल्या. व्हिडिओमध्ये मागे एक महिला अधिकारी गाणं म्हणत असल्याचे ऐकायला येत आहे.

व्हिडीओ काढणारी महिला मास्क लावा प्रभू, आपले नाही तर दुसऱ्यांचे तरी प्राण वाचवा अशी आरती म्हणताना दिसत आहे. त्यामुळे समोर उभी असलेली व्यक्तीने लाजेमुळे मान घातली.

दरम्यान, कोरोना काळात मास्क असल्याशिवाय घराबाहेर पडणेही कठीण बनलंय. तरीही अनेकजण नियमांचं उलंघन करताना दिसतात.

 

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आतप्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….

भारतीय संघात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा ‘हा’ पहिलाच क्रिकेटपटू

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More