बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा

मुंबई | सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक कलांकारांनी त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध वाचा फोडली. बॉलिवूडमध्ये घराणेशाही कशी चालते आणि इतर कलाकारांना कसं डावललं जातं, यावर कंगना राणावत, प्रकाश राजनंतर आता अभिनेता अभय देओलने सुद्धा खंत व्यक्त केली आहे.

इन्स्टाग्रामवर अभयने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत त्यावेळी घडलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये अभय लिहितो, “या चित्रपटात हृतिक, फरहान, कतरिना आणि मी प्रमुख भूमिकेत होतो. मात्र  प्रमुख भूमिकेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी केवळ हृतिकला नामांकन देण्यात आलं. त्यावेळी पुरस्कार सोहळ्यात मला आणि फरहानला मुख्य अभिनेत्यांच्या नामांकनांमधून वगळून सहाय्यक अभिनेते म्हणून नामांकन देण्यात आलं.”

या इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीच्या अनेक लॉबी आहेत ज्या तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात काम करतात. या घटनेनंतर मी पुरस्कार सोहळ्यांवर बहिष्कार घातला, असं म्हणत अभयने राग व्यक्त केलाय.

दरम्यान, सोनू निगमने देखील संगीत क्षेत्रात असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक गायक यामुळे नैराश्यात आहेत, असंही त्यानं सांगितलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

“Zindagi Na Milegi Dobara”, released in 2011. Need to chant this title to myself everyday nowadays! Also a great watch when anxious or stressed. I would like to mention that almost all the award functions demoted me and Farhan from main leads, and nominated us as “supporting actors”. Hrithik and Katrina were nominated as “actors in a leading role”. So by the industry’s own logic, this was a film about a man and a woman falling in love, with the man supported by his friends for whatever decisions he takes. There are many covert and overt ways in which people in the industry lobby against you. In this case it was shamelessly overt. I of course boycotted the awards but Farhan was ok with it. #familyfareawards Very creative artwork @kalakkii

A post shared by Abhay Deol (@abhaydeol) on

ट्रेंडिंग बातम्या-

अंकिताला खूपच मिस करत होता सुशांत; डॉक्टरांनी केले ‘हे’ महत्त्वाचे खुलासे

…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

“चिनी उत्पादनांवरील बंदीने चीनच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही”

चीनला धडा शिकवण्यासाठी भारताचा ‘प्लॅन बी’ तयार, वापर करणार?

अंदमान-निकोबार बेटांवर विशेष लक्ष द्या, नौदलाला सतर्कतेचा इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More